यशोगाथा १००% तंबाखूमुक्त शाळांचे तालुक्याची
होय, हे शक्य झाले आहे...........
सर्वप्रथम मोर्शी तालुका
१००% तंबाखूमुक्त शाळांचा तालुका झालेला आहे त्याबद्दल तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचे आणि या अभियानास साहाय्य करणाऱ्या टीम चे मनः पूर्वक अभिनंदन आणि आभार !!!!!
आपणास कळविण्यास अभिमान वाटतो की, मोर्शी हा अमरावती जिल्ह्यातील प्रथम तसेच राज्यातील आठवा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका झालेला आहे. अवघ्या ३ महिन्यांच्या कालावधीत आपण हे यशाचं शिखर गाठलं आहे. अभियानाला सुरुवात करण्याअगोदर तालुक्यातील फक्त तीनच शाळा तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आलेल्या होत्या. आणि अल्पावधीतच आपण आपलं उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी झालो.
विशेषतः वरिष्ठ स्तरावरून कुठलाच लेखी
आदेश नाही की कुठलीच जबरदस्ती नाही.
तंबाखू मुक्त अभियानात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मनापासून काम केलं आणि हे या अभियानाचं सर्वात मोठं वैशिष्ट.
अभियानाची पार्श्वभूमी
शासन परिपत्रक दि.०६ जून २०१९ नुसार सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविणे
आवश्यक आहे.
अभियानाचं उद्दीष्ट
ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम करण्यासाठी विविध सामाजिक घटकांना एकत्र करून शाळा तंबाखू मुक्त करणे. यासोबतच शालेय शिक्षणातून तंबाखू नियंत्रण, स्वच्छता आणि पोषणमूल्य या संदर्भात माहिती देणे. आणि समाजात शाश्वत बदल घडवून मूल तंबाखूमुक्त निरोगी आयुष्य जगू शकेल. .
बालपणी व्यक्तीचं मन संस्कारक्षम असतं. बालपणी तुमच्या सोबत जे घडते त्यानुसार तुमचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व आकार घेते. आणि तेच तुमच्या जीवनावर राज्य करते. शाळा तंबाखू मुक्त करतांना अनेकांच्या मनात असा प्रश्न आला असेल की, मी किंवा माझे विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत नाही तेव्हा शाळा तंबाखू मुक्त करण्याची गरजच काय? पण या कार्यक्रमातून आपण त्या बालमनावर तंबाखू सेवनाची दाहकता कोरली आहे. ज्या योगे तो/ती भविष्यात तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहील. आणि तंबाखूचे दुष्परिणाम, चांगले आरोग्य या बाबतचे ज्ञान आत्मसात करून स्वतः तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न जीवन निर्वाह करतील.
अभियानाची अंमलबजावणी
तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यासाठी तसेच सलाम मुंबई फाउंडेशन च्या app वर पुरावे सादर करण्याच्या प्रक्रीये विषयी साहाय्य करण्यासाठी तंबाखू मुक्त तालुका टीम चे गठन करण्यात आले. या टीम मध्ये
१) श्री. मनीष काळे
२) श्री.राजकुमार खर्चान
३)श्री.दिनेश साबळे.
४) सौ. सीमा पाटील
५)सौ.प्रियंका काळे
६)श्री. सुरेश डोंगरदिवे
७)श्री. निलेश इंगोले
८)श्री.सूरज अंबाडकर
९)श्री.मुजाहिद फराज.
१०)श्री.श्रीकांत खाजोने
११)श्री.अमित काकपुरे
१२)श्री. मुश्ताक शाह
१३)श्री. धनराज कुंजेकर
१४)श्री. संजय धांडे
१५)श्री. अमोल अर्मळ
या सर्व सदस्यांना शाळा निहाय जबाबदारी सोपविण्यात आली. शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच शिक्षकांनी अभियानाला उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन दि.१५ सप्टे.२०१९ ला सुरु झालेल्या या अभियानाला दि.१२ डिसेंबर २०१९ रोजी पूर्णत्वास नेऊन तालुक्याचे नाव या अभियानात संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अव्वल स्थानी नेले.
अभियानाची सद्यस्थिती
पंचायत समिती मोर्शी मधील शाळा बाबत माहिती
जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या १०२ पैकी १०२ शाळा आणि इतर व्यवस्थापनाच्या(नगरपरिषद आणि खाजगी) ३४ अशा एकूण १३६ शाळा आज रोजी पर्यंत तंबाखूमुक्त शाळा म्हणून सलाम मुंबई फाउंडेशन द्वारा मान्यताप्राप्त झालेल्या आहेत.
होय, आपणा सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. मी पेक्षा आम्ही हे या तंबाखूमुक्त शाळांचा तालुक्याच्या यशाचं गुपित आहे. जीवनात लहानशी गोष्ट असं काहीच नसतं. बऱ्याचदा अश्या या लहान-लहान गोष्टीच मोठा बदल घडवून आणतात.
💐💐💐💐💐💐💐
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत या खात्रीसह.........
गटशिक्षणाधिकारी
पं. स. मोर्शी

No comments:
Post a Comment