जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील
विद्यार्थिनीचे सुयश
पिंपरी ता. मोर्शी ----आजच्या या कॉन्व्हेंट संस्कृती मध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण हे फक्त खाजगी शाळेत किंवा कॉन्व्हेंट मध्येच मिळते असा एक समज दृढ झालेला आहे. पण या (गैर) समजाला फाटा देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील विद्यार्थिनीने घवघवीत यश प्राप्त करत एक नवीन विचार रुजविला आहे. गोरगरीब, सामान्य जनतेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी सुद्धा आता कात टाकली असून स्पर्धेच्या या युगात त्या सुद्धा मागे नाहीत. अशीच एक यशोगाथा आहे ती, कु. सोनम गंफू परिहार हिची. गणित अध्यापक मंडळ जिल्हा –अमरावती तर्फे आयोजित “गणित संबोध परीक्षा- सन-२०१९-२०” मध्ये सोनमने इयत्ता ५ वी तून संपूर्ण मोर्शी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून जणू काही संदेश दिला आहे की, आम्ही Z.P ची मुलं कुठंही कमी नाही. तिने आपल्या यशाचे श्रेय तिची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे वर्गशिक्षक श्री.महेंद्रसिंग सलामे व शाळेचे मुख्याध्यापक श्री.गजानन ठाकरे आणि आई–वडिलांना दिले.

तिच्या या
अभूतपूर्व यशाबद्दल शाळेतील शिक्षक सौ.पाटील, सौ.ठाकरे, श्री.देशमुख, श्री.सातपुते, श्री.राऊत आणि श्री.अंबाडकर ह्यांनी तिचे कौतुक केले
असून भविष्यातील तिच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे शिक्षण विभाग पंचायत समिती कार्यालय मोर्शीच्या
वतीने कु.सोनम चे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी श्रीमती.अश्विनी पवार, विस्तार अधिकारी
श्री.बडवाईक सर व अंबाडा केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती.गाडे ह्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment