Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

Showing posts with label अभिनंदन/शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label अभिनंदन/शुभेच्छा. Show all posts

Sunday, June 28, 2020

Sunday, June 28, 2020

यशवंत व्हा ! किर्तीवंत व्हा !!


यशवंत व्हा !  किर्तीवंत व्हा !!

आजचं युग हे स्पर्धेचं युग म्हणून ओळखलं जातं. ही स्पर्धा जर निकोप असेल  तर नक्कीच विद्यार्थ्याच्या विकासास पोषक ठरते. आपण जाणताच की, कुठलंही क्षेत्र असो, सरकारी अथवा खाजगी, वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी - स्पर्धा परीक्षांना आता पर्याय नाही. योग्य उमेदवार निवडण्याचे  ते महत्त्वाचे साधन ठरते.

त्यामुळे आता हे आवश्यक झालं आहे की, या स्पर्धा परीक्षांची ओळख आणि सराव हा प्राथमिक शाळेपासूनच सुरु व्हायला हवा. अशीच शालेय जीवनातील  एक महत्त्वाची स्पर्धा परीक्षा म्हणजे जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा  होय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या उद्देशाने ही विदयालये केंद्र शासनामार्फत कार्यान्वित आहेत.

कुठल्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणे म्हणजे एक दिव्यचं,नाही का? हे साध्य करण्यासाठी आवश्यक असतो तो सराव , योग्य मार्गदर्शन आणि यश मिळविण्याची दृढ इच्छा. आपल्या मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चिमुकल्यांनी  हे साध्य करून दाखवलंय . चला तर मग ह्या सर्वांचं अभिनंदन करूया !!!!!

रोहन मंगेशराव चरडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (मुले),नेरपिंगळाई

कु.संचिता राहुल मोहोकर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (मुली),नेरपिंगळाई

राज ज्ञानेश्वर धुर्वे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेड

 

खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील १० विद्यार्थ्यांची  या  प्रवेश परीक्षेतून निवड झाली आहे.

शिक्षण विभाग पंचायत समिती मोर्शी  तर्फे निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  आणि त्यांना मार्गदर्शन करणारे  शिक्षक बंधू /भगिनी  ह्यांचे खूप खूप अभिनंदन !!!!  विद्यार्थ्यांच्या  भविष्यातील  पुढील  वाटचालीस  अनंत  शुभेच्छा.

 


Wednesday, March 11, 2020

Wednesday, March 11, 2020

जिल्हा परिषद उर्दू शाळा शिरखेड येथे विद्यार्थ्यांची “विज्ञान जत्रा”

जिल्हा परिषद उर्दू शाळा शिरखेड येथे विद्यार्थ्यांची “विज्ञान जत्रा

 दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा शिरखेड येथे दिनांक २६ जानेवारी २०२० रविवार रोजी सकाळी ८.०० वाजता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शेख.फारुख यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पारडला.तद्नंतर शाळेत स्वयं निर्मित टाकाऊ वस्तू पासून तयार केलेल्या झिरो बजेटविज्ञान प्रयोग शाळेचे “विज्ञान जत्राया उपक्रमाच्या माध्यमातून प्रदर्शनी लावण्यात आली.
 विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवर व ग्रामस्थांच्या समोर सादरीकरण केले तसेच
विविध साहित्य व खाद्यपदार्थांच्या मदतीने प्रत्यक्ष प्रयोग करून दाखविले.प्रयोग पाहून उपस्थितांनी प्रश्न विचारून वैज्ञानिक संबोध सुद्धा समजून घेतले.गावपातळी वर घेण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी समस्त पालक व मान्यवरांनी मुख्याध्यापकासह सर्वशिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.गावातील इतर सर्व शाळांचे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी विज्ञान जत्रेला भेट दिल्याने कार्यक्रमात अतिउत्सहात्मक वातावरण होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांची कल्पकता, प्रयोगांची विविधता व दर्जा, ग्रामस्थांची उत्सुकता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांची शाळेबद्दलची आपुलकी सर्वच कौतुकास्पद होते.
या कार्यक्रमाला मा.श्री.प्रमोदराव बोबडे उद्घाटक, सौ.सुनंदाताई तागडे(सरपंच,शिरखेड) अध्यक्षा तथा सौ.अश्विनी पवार(ग.शि.अ.मोर्शी) प्रमुख अतिथी म्हणून लाभले.तसेच श्री.विकासराव तट्टे(उपसरपंच), युनुस खान मोहम्मद खान, गजानन तेलमोरे, सौ.शिवकन्या ताई खराते, खलीलअहमद खान, जाहीर खान, मो.सादिक, शेख.जमील, अविनाश राते, शाळेतील शिक्षक मो.रिजवान सर, मुशताक शाह सर, सीमा अंजुम मैडम, व इतर पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मो.मुजाहिद सरांनी तथा संचालन शकील अहमद सरांनी केले.

Monday, December 23, 2019

Monday, December 23, 2019

मोर्शी तालुका - १००% तंबाखूमुक्त शाळांचा तालुका

यशोगाथा  १००% तंबाखूमुक्त शाळांचे तालुक्याची
होय, हे शक्य झाले आहे...........
 सर्वप्रथम मोर्शी तालुका
१००% तंबाखूमुक्त शाळांचा तालुका झालेला आहे त्याबद्दल तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचे आणि या अभियानास साहाय्य करणाऱ्या टीम चे मनः पूर्वक अभिनंदन आणि आभार !!!!!
   
आपणास कळविण्यास अभिमान वाटतो की, मोर्शी हा अमरावती जिल्ह्यातील प्रथम तसेच राज्यातील आठवा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका झालेला आहे. अवघ्या ३ महिन्यांच्या  कालावधीत आपण हे यशाचं शिखर गाठलं आहे. अभियानाला सुरुवात करण्याअगोदर तालुक्यातील फक्त तीनच शाळा तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आलेल्या होत्या. आणि अल्पावधीतच आपण आपलं उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी झालो.
विशेषतः वरिष्ठ स्तरावरून कुठलाच लेखी
आदेश नाही की कुठलीच जबरदस्ती नाही.
तंबाखू मुक्त अभियानात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मनापासून काम केलं आणि हे या अभियानाचं सर्वात मोठं वैशिष्ट.
 अभियानाची पार्श्वभूमी
शासन परिपत्रक दि.०६ जून २०१९ नुसार सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविणे
आवश्यक आहे.
 अभियानाचं उद्दीष्ट
ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम करण्यासाठी विविध सामाजिक घटकांना एकत्र करून शाळा तंबाखू मुक्त करणे. यासोबतच शालेय शिक्षणातून तंबाखू नियंत्रण, स्वच्छता आणि पोषणमूल्य या संदर्भात माहिती देणे. आणि समाजात शाश्वत बदल घडवून मूल तंबाखूमुक्त निरोगी आयुष्य जगू शकेल.  .
बालपणी व्यक्तीचं  मन संस्कारक्षम असतं. बालपणी तुमच्या सोबत जे घडते त्यानुसार तुमचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व आकार घेते. आणि तेच तुमच्या जीवनावर राज्य करते. शाळा तंबाखू मुक्त करतांना अनेकांच्या मनात असा प्रश्न आला असेल की, मी किंवा माझे विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत नाही तेव्हा शाळा तंबाखू मुक्त करण्याची गरजच काय? पण या कार्यक्रमातून आपण त्या बालमनावर तंबाखू सेवनाची दाहकता कोरली आहे. ज्या योगे तो/ती भविष्यात तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहील. आणि तंबाखूचे दुष्परिणाम, चांगले आरोग्य या बाबतचे ज्ञान आत्मसात करून स्वतः तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न जीवन निर्वाह करतील.
 अभियानाची अंमलबजावणी
तालुक्यातील  सर्व शाळांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यासाठी तसेच सलाम मुंबई फाउंडेशन च्या app वर  पुरावे सादर करण्याच्या प्रक्रीये विषयी साहाय्य करण्यासाठी तंबाखू मुक्त तालुका टीम चे गठन करण्यात आले. या टीम मध्ये
१) श्री. मनीष काळे
२) श्री.राजकुमार खर्चान
३)श्री.दिनेश साबळे.
४) सौ. सीमा पाटील       
५)सौ.प्रियंका काळे
६)श्री. सुरेश डोंगरदिवे
७)श्री. निलेश इंगोले
८)श्री.सूरज अंबाडकर
९)श्री.मुजाहिद फराज.
१०)श्री.श्रीकांत खाजोने
११)श्री.अमित काकपुरे
१२)श्री. मुश्ताक शाह
१३)श्री. धनराज कुंजेकर
१४)श्री. संजय धांडे
१५)श्री. अमोल अर्मळ
 या सर्व सदस्यांना शाळा निहाय जबाबदारी सोपविण्यात आली. शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच शिक्षकांनी अभियानाला उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन दि.१५ सप्टे.२०१९ ला सुरु झालेल्या या अभियानाला दि.१२ डिसेंबर २०१९ रोजी पूर्णत्वास नेऊन तालुक्याचे नाव या अभियानात संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अव्वल स्थानी नेले.
अभियानाची सद्यस्थिती 
पंचायत समिती मोर्शी मधील शाळा बाबत  माहिती
जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या १०२ पैकी १०२ शाळा आणि इतर व्यवस्थापनाच्या(नगरपरिषद आणि खाजगी) ३४ अशा एकूण १३६ शाळा आज रोजी पर्यंत तंबाखूमुक्त शाळा म्हणून सलाम मुंबई फाउंडेशन द्वारा मान्यताप्राप्त झालेल्या आहेत.
  होय, आपणा सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. मी पेक्षा आम्ही हे या तंबाखूमुक्त शाळांचा तालुक्याच्या यशाचं गुपित आहे. जीवनात लहानशी गोष्ट असं काहीच नसतं. बऱ्याचदा अश्या या लहान-लहान गोष्टीच मोठा बदल घडवून आणतात.
💐💐💐💐💐💐💐
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत या खात्रीसह.........
                                गटशिक्षणाधिकारी
                                   पं. स. मोर्शी

Tuesday, December 17, 2019

Tuesday, December 17, 2019

मोर्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.....अभिनंदन





मोर्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...........

🙏🙏🙏🙏
    
मोर्शी पंचायत समिती- शिक्षण विभागाच्या शैक्षणिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोर्शी तालुक्यातील नवं-नवीन शैक्षणिक घडामोडी,प्रशासकीय पत्रे,नाविन्यपूर्ण उपक्रम त्याचप्रमाणे शाळांची वैशिष्ट्यपूर्ण उपलब्धी आपणापर्यंत पोहचविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. आणि आपण त्यास देत असलेल्या प्रतिसादाबद्दल  आभार......

 जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीत मोर्शी शिक्षण विभागाने आपलं एक स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. मोर्शीच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा सतत उंचावत आहे. आणि नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ह्याचा  प्रत्यय आपणा सर्वांनाच आला. आपल्या मोर्शी तालुक्यातील दोन शिक्षकांना जिल्हा स्तरावरील  वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी आपण थेट राज्य स्तरावर मजल मारली आहे. आपल्या मोर्शी तालुक्यातील शिक्षकांना हा सन्मान मिळाला आहे.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद २०१९ मध्ये  मोर्शी पं.स. अंतर्गत कार्यरत असणारे
१)श्री. मोहम्मद मुजाहिद अब्दुल हमीद (प्र. के.प्र. केंद्र-शिरखेड)

उल्लेखनीय कार्य-

*शिक्षण विभाग मोर्शीच्या संकेतस्थळ निर्मिती मध्ये बहुमूल्य सहकार्य.

*उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक

*लोकवर्गणीतून शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक विकास.



*उत्कृष्ट TAG समन्वयक


*स्पोकन इंग्लिश उपक्रम शाळेत यशस्वीपणे  राबविला.

* तंबाखू मुक्त शाळा आणि तंबाखू मुक्त केंद्र  करण्यासाठी महत्त्वाची भूमिका.

*१००% प्रगत शाळा.


२) श्री.निलेशकुमार रामभाऊजी इंगोले(प्र.मु.अ. जि.प.प्रा.मराठी शाळा,बऱ्हाणपूर)

*आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार-२०१९ प्राप्त  शिक्षक

उल्लेखनीय कार्य -
 *जि.प.प्रा.शाळा बऱ्हाणपूर-तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित व सलाम मुंबई फौंडेशन मार्फत प्रमाणपत्र  प्राप्त.

*मोर्शी पं.स.च्या शिक्षण विभागाचे संकेतस्थळ   www.educationmorshi.com विकसित करण्याकरिता मोलाचे सहकार्य

*सन्मान प्रेरणेचा –सन्मान गुणवत्तेचा या अमरावती जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत मोर्शी तालुकांतर्गत तपासणीत शाळेचा तालुक्यातून तृतीय क्रमांक

*चला चौरस खेळूया या नाविन्यपूर्ण उपक्रमाची गणित विषयासाठी सुरवात.

*प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा निर्मिती.

*समतादूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था अमरावती मार्फत विविध स्वच्छतेविषयक शिबीर आयोजन व प्रबोधन.

*शाळाबाह्य विद्यार्थी विरहीत गाव ,शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात सहभाग.  

३)श्री जावेद इकबाल जोहर(प.शि.भाषा जि.प.पू.मा.उर्दू.शाळा.नेर पिंगळाई)                           
उल्लेखनीय कार्य-

*अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदे तर्फे सन्मानित

* राज्य ते जिल्हा,तालुका  स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका

* शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील

  वरील तिन्ही शिक्षकांना

 गुणवंत शिक्षक गुरुगौरव  शिक्षकरत्न पुरस्कार २०१९

देऊन सन्मानित करण्यात आले.  दि. १० डिसेंबर २०१९ रोजी मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात हा राज्यस्तरीय भव्यदिव्य सोहळा पार पडला.
💐💐💐💐💐💐
पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.👏👏👏👏

 आपल्या सर्वांच्या पुढील शैक्षणिक कार्यास अनेक शुभेच्छांसह....💐💐💐🏵🏵🏵🏵🏵

शुभेच्छुक,
   शिक्षण विभाग
   पं. स. मोर्शी

Sunday, December 15, 2019

Sunday, December 15, 2019

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोल येडगे साहेबांचे मनःपूर्वक स्वागत


💮स्वागतम💮

     स्वागतम 

💮सुस्वागतम 💮
शिक्षण विभाग पंचायत समिती मोर्शी,
www.educationmorshi.com या आमच्या शैक्षणिक व प्रशासकीय संकेतस्थळाच्या माध्यमातून  अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री.अमोल येडगे साहेबांचे मनःपूर्वक स्वागत 🙏🏼.

 "आगमनाने आपुल्या हर्ष-उल्हासीत झाले सर्व जण,
गाठू प्रगतीची नवी शिखरं एकमेकांच्या सहकार्याने आपण "


About:
Res. Mr. Amol Yedge sir (Chief Executive Officer, Z.P Amravati).

Since 09/12/2019


Many important posts he held earlier are:


*Directorate Of Information And Technology, Mumbai, Maharashtra.


*Chief Executive Officer, Z.P Beed, Maharashtra.


*Assistant Collector And Project Officer, ITDP, Nashik, Maharashtra.


*Assistant Collector Kalamnuri Sub Division Hingoli, Maharashtra.
💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*💮*

शुभेच्छूक

शिक्षण विभाग पंचायत समिती, मोर्शी (www.educationmorshi.com)

सर्व कार्यालयीन कागदपत्रे,पगार पत्रके,शालेय विद्यार्थी,शिक्षक, व शालेय भौतिक सुविधांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध. सोबतच, सर्व शाळांचे व शिक्षकांचे हक्काचेे व्यासपीठ. नुकताच आमच्या संकेतस्थळाने 50000 views चा टप्पा पार केला.

 💮*💮*💮*💮💮* 

👆 आवश्य भेट द्या 👆  

💮*💮*💮*💮💮*


Monday, December 2, 2019

Monday, December 02, 2019

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील विद्यार्थिनीचे सुयश

पिंपरी ता. मोर्शी ----आजच्या या कॉन्व्हेंट संस्कृती मध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण हे फक्त खाजगी शाळेत किंवा कॉन्व्हेंट मध्येच मिळते असा एक समज दृढ झालेला आहे. पण या (गैर) समजाला फाटा देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील विद्यार्थिनीने घवघवीत यश प्राप्त करत एक नवीन विचार रुजविला आहे. गोरगरीब, सामान्य जनतेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी सुद्धा आता कात टाकली असून स्पर्धेच्या या युगात त्या सुद्धा मागे नाहीत. अशीच एक यशोगाथा आहे ती, कु. सोनम गंफू परिहार हिची. गणित अध्यापक मंडळ जिल्हा अमरावती तर्फे आयोजित गणित संबोध परीक्षा- सन-२०१९-२० मध्ये सोनमने इयत्ता ५ वी तून संपूर्ण मोर्शी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून जणू काही संदेश दिला आहे की, आम्ही Z.P ची मुलं कुठंही कमी नाही. तिने आपल्या यशाचे श्रेय तिची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे वर्गशिक्षक श्री.महेंद्रसिंग सलामे व शाळेचे मुख्याध्यापक श्री.गजानन ठाकरे आणि आईवडिलांना दिले.  

तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेतील शिक्षक सौ.पाटील, सौ.ठाकरे, श्री.देशमुख, श्री.सातपुते, श्री.राऊत आणि श्री.अंबाडकर ह्यांनी तिचे कौतुक केले असून भविष्यातील तिच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



त्याचप्रमाणे शिक्षण विभाग पंचायत समिती कार्यालय मोर्शीच्या वतीने कु.सोनम चे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी श्रीमती.अश्विनी पवार, विस्तार अधिकारी श्री.बडवाईक सर व अंबाडा केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती.गाडे ह्यांनी केले आहे.
 

Monday, August 26, 2019

Monday, August 26, 2019

यशोगाथा लोकसहभागाची-----जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड

यशोगाथा लोकसहभागाची





जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड💐💐💐💐💐

आपल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा असाव्यात असं कुणाला वाटत नाही ? भौतिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना सोयी सुविधा तर मिळतातच पण, शाळेचं  बाहयरुप सुद्धा खुलून दिसतं. विद्यार्थी शिक्षक जिथे सहा- सात तास राहतात, तिथे त्यांना मनापासून आनंदानं राहावसं वाटतं.
शाळांमध्ये असावी अशी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे  हॅण्ड वॉश स्टेशन. कुणाला वाटत नाही  की,माझ्या शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन असावं? त्यातून विद्यार्थ्याला स्वच्छतेचे संस्कार आपसुकच मिळतात. RTEअंतर्गत शाळेच्या दहा निकषांमध्ये म्हणूनच हॅण्डवॉश  स्टेशन समाविष्ट केले गेले आहे. निरामय आरोग्याची सुरुवात स्वच्छ हातांपासून होते आणि अभ्यासातील प्रगती आणि आरोग्याचा सहसंबंध सर्वमान्य आहेच.

गाव करी ते राव न करी, या उक्तीप्रमाणे लोकसहभागाचे महत्त्व सर्वश्रुत आहेच. अशाच एका यशस्वी लोकसहभागाची कथा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, हिवरखेड येथे उभं राहिलेलं  हॅण्ड वॉश  स्टेशन. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये  hand wash station ची  संकल्पना सर्व संमत करण्यात आली. पण पैसा कसा उभारायचा? ही अडचण सर्वांसमक्ष उभी ठाकली. मग या  hand wash स्टेशनसाठी तर एक भन्नाट कल्पना सुचवण्यात आली. याकरीता शाळेतच मंदिरांप्रमाणे दानपेटीत ठेवण्यात आली. दरवर्षी दानपेटी जुलै महिन्यात फोडण्यात येत असे.पण त्यातूनही पुरेसा निधी उभा राहिला नाही. अशा वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गोपालभाऊ मडघे त्याचप्रमाणे गावातील काही शिक्षणप्रेमी मंडळी यांनी भरघोस दान देऊन जवळपास तीस हजार रुपये निधी जमा केला. चांगल्या कार्यास परमेश्वराचं सहाय्य असतं असं म्हणतात, त्याचप्रमाणे गावातील श्री. नंदकिशोर गांधी यांनी या हॅण्डवॉश स्टेशन ला टाईल्स दिल्या. आणि एखाद्या स्वप्नाप्रमाणे हे हँडवॉश स्टेशन उभे राहीले....
लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं .
आणि या पंधरा ऑगस्टला पंचायत समिती सदस्या मा.सौ मायाताई वानखडे, सरपंच श्री. विजयभाऊ पाचारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गोपालभाऊ मडके, गावकरी मंडळी पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॅण्ड वॉश स्टेशन चा उद्घाटनीय सोहळा पार  पडला. आता हे हॅण्ड वॉश  स्टेशन विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू झालेले आहे.

ऋणनिर्देश🙏🙏

या विद्यार्थी उपयोगी hand wash station करिता समाजातील ज्या सर्व दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले,त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन  💐💐


Thursday, July 18, 2019

Thursday, July 18, 2019

इयत्ता १० वी व १२ वी च्या पुनर्परीक्षार्थ्यांना अनेक शुभेच्छांसह........

इयत्ता १० वी व १२ वी च्या पुनर्परीक्षार्थ्यांना अनेक शुभेच्छांसह........


इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी ची फेरपरीक्षा  दि .१७ जुलै ते ०३ ऑगस्ट २०१९ च्या दरम्यान होत आहे.या परीक्षेला आपल्या मोर्शी तालुक्यातून अनुक्रमे ४५३ व २३९ विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत .या सर्व विद्यार्थी मित्रांना अनेक शुभेच्छा ....
          विद्यार्थी मित्रांनो, १० वी किंवा १२ वी त अपयश आलं ,म्हणजे पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं वाटत की,आपलं शैक्षणिक करिअर संपल. जणूकाही १० वी व १२ वीची परीक्षाच आयुष्याच्या यशाचं परिमाण होय.पण या संदर्भात एक वेगळीच कथा लिहून ठेवलीय आहे ती मुंबईचे अपर पोलीस आयुक्त डॉ.मनोजकुमार शर्मा ह्यांनी. वर्ग ९ ते ११ वी पर्यंत तृतीय श्रेणीत कसेबसे उत्तीर्ण होणारा व इयत्ता १२ वी त नापास होणारा हा तरूण  जिद्द आणि मेहनतीच्या भरवश्यावर आज प्रशासकीय सेवेत उच्च पदी विराजमान आहे .या तरुणाने शिक्षणासाठी पैसा उभा करतांना कुठलही काम केल, अगदी श्रीमंतांच्या घरची कुत्री सुद्धा फिरवून आणली.
           तेव्हा, मित्रांनो अपयशाने खचून न जाता यशासाठी सतत संघर्ष करणे हेच यशस्वी जीवनाचे सूत्र आहे.एक युद्ध हरलो म्हणून जीवनाची लढाई हरलो असे होत नाही, हो .....ना?

         कोशिश के बावजूद हो जाती है कभी हार 
         होके निराश मत बैठ यार
         बढते रहना आगे, हो जैसा भी मौसम 
 पा लेती है मंजिल चिटी भी, गिर कर कई बार ..........
   
पुनश्च  आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा .... 📖📖📖📖

Tuesday, July 9, 2019

Tuesday, July 09, 2019

नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

जुन महिना----------------
1) SMC मिटिंग आयोजन 24/6
2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.
3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन
4) Student pramotion करणे.
5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.
6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.
7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.
8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.
9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम
10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड
11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.
12) Staff Attach-deteach करणे.
13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6
14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ
15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.
16)शा.पो.आ. करारनामा करणे.
17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.
18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.

जुलै महिना----------------
1) माता-पालक संघ सभा
2) सरल st. request-coinfirm पाठविणे.
3) मीना राजु मंच सभा
4) SMC मिटिंग
5) कथाकथन स्पर्धा आयोजन
6) शा.पो.आ.सभा
7) दिंडी उपक्रम आयोजन
8) पालक सभा आयोजन
9) आदर्श परिपाठ तयारी
10) गुरुपोर्णिमा उपक्रम
11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी
12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी
13)पायाभुत चाचणी 1 आयोजन

आँगस्ट महिना------------------
1) Student माहिती online भरणे.
2) शिक्षक -पालक संघ सभा
3) SMC मिटिंग आयोजन
4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी
5) सरल school portal भरणे.
6) सरल Staff portal भरणे.
7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम
8) अकारिक चाचणी १ आयोजन
9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन
10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8
11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन
12) परिसर सहल आयोजन

सप्टेंबर महिना-----------------
1) माता-पालक संघ सभा
2) संच मान्यता portal भरणे.
3) गणपती उपक्रम
4) SMC मिटिंग
5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.
6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
7) शा.पो.आ.सभा
8) मीना राजु मंच सभा
9) पालक सभा आयोजन
10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.
11) पायाभुत online marks भरणे.
12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.
13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.
14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम
15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9


आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना--------------------
1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.
2) सत्र 1 परीक्षा घेणे.
3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन
4) स्वच्छता अभियान राबविणे.
5) SMC मिटिंग
6) दिवाळी अभ्यास नियोजन
7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10
8) नवरात्र भोंडला आयोजन.
9) चित्रकला उपक्रम आयोजन.
10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.
11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी
12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.
13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन
14) शिक्षक -पालक संघ सभा
15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन
16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10


डिसेंबर  महिना --------------------
1) माता पालक संघ सभा
2) SMC मिटिंग
3) शा.पो.आ.सभा
4) पालक सभा आयोजन
5) कला व क्रिडा स्पर्धा
6) शैक्षणिक सहल आयोजन
7) Udise+ Online भरणे
8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.
9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम


जानेवारी महिना------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
3) सा.फुले जयंती उपक्रम
4) सांस्कृतिक कार्यक्रम
5) बाल आनंद मेळावा
6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1
7)नेताजी जयंती 23/1
8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन


फेब्रुवारी महिना --------------------------
1) माता पालक संघ सभा
2) शा.पो.आ.सभा
3) पालक सभा आयोजन
4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा
5) आकारिक चाचणी 2 आयोजन
6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी
7) शिवजयंती कार्यक्रम 19/2
8) Udise + online भरणे.


मार्च महिना -------------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2)SMC मिटिंग
3) वार्षिक तपासणी
4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ
5) शाळेची वार्षिक तपासणी
6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग
7) SSA online link भरणे.
8) जागतिक महिला दिन 8/3
9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3
10) जागतिक अपंग दिन 17/3
11) संत गाडगेबाबा जयंती 4/3
12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.

एप्रिल महिना -----------------
1) माता-पालक संघ सभा
2)शा.पो.आ. सभा
3) द्वितीय सत्र परीक्षा
4) पायाभुत चाचणी 3
5) माँडरेशन तयारी
6) महात्मा फुले जयंती 11/4
7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.
8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.
9) आंबेडकर जयंती 14/4
10) नवोद्य परीक्षा 5 वी
11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी

मे महिना ----------------------
1)निकाल जाहीर करणे
2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.
3) पुढील वर्ष वर्गवाटप,
4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.
5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.
6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल
7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.
 ----------------------------------------

Tuesday, May 28, 2019

Tuesday, May 28, 2019

नवोदय विद्यालय प्रवेशाकरिता निवड

अभिनंदन                   
 जि.प.प्राथ.मराठी शाळा , काटपूर येथील  विदयार्थी निदेश प्रविण उमेकर ह्याची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरिता निवड झाली. निदेशच्या उत्कृष्ट यशाकरीता  वर्गशिक्षिका कु.ज्योत्स्ना गोहत्रे मॅडम,मुख्याध्यापक श्री.प्रकाशभाऊ गुल्हाने,पालक श्री.प्रविणभाऊ उमेकर सर्वाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

💐💐💐🙏🙏💐💐💐


2. 

निवृत्ती गजानन लोखंडे  जि.प. पूर्व माध्यमिक मराठी शाळा, अष्टोली पं.स. मोर्शी याची नवोदय विद्यालय करिता निवड झाल्याबद्दल त्याचे व मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक श्री. डोंगरदिवे सर यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹


३. यश वरघट जि.प. प्राथमिक शाळा (मुले), नेर  याची नवोदय विद्यालय साठी निवड झाल्या बद्दल त्याचे व त्याचे वर्गशिक्षिका ,मुख्याध्यापिका यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐