Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

Showing posts with label शालेय पोषण आहार. Show all posts
Showing posts with label शालेय पोषण आहार. Show all posts

Monday, May 20, 2019

Monday, May 20, 2019

आठवड्यातून ३ दिवस पूरक आहार पुरविणेबाबत


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुष्काळग्रस्त भागात सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविणे बंधनकारक असल्याचे मा.शिक्षण संचालक (प्राथ) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र.जाक्र. प्राशिस/शापोआ/२०१९/  दुष्काळ/३०२/११३२ दि/ १५/०५/२०१९ या पत्रात नमूद आहे. महसूल व वन विभाग शा.नि. क्र. एससीवाय २०१८/प्रक्र८९/म-७/दि.३०/१०/२०१८ नुसार मोर्शी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. करिता मोर्शी तालुक्यातील सर्व गावांमध्ये शालेय पोषण आहाराचा पुरवठा करावा लागेल. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शा.नि.शापोआ-२०१६ प्रक्र.२६२/एस डी ३/मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय,मुंबई दि.२९/०५/२०१७ या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दुध/ अंडी / फळे असा पौष्टिक आहार द्यावयाचा आहे.
कुठलाही विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी.या बाबत संदर्भ  यापूर्वीच या कार्यालयाद्वारे पत्राद्वारेसूचना देण्यात आलेल्या आहेत. पोषण आहाराकरिता विद्यार्थी शाळेत यावेत याकरिता शाळांनी योग्य ते नियाजन करावे व सुट्टीतही पोषण आहार मिळत असल्याबाबत गावात अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी जेणेकरून विद्यार्थी शाळेत येतील.

केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील शापोआ पात्र सर्व शाळांना भेटी देऊन याबाबत आढावा घ्यावा व याबाबत या कार्यालयास अहवाल सादर करावा.
-स्वा- 
गटशिक्षणाधिकारी
पं.स.मोर्शी



Monday, May 6, 2019

Monday, May 06, 2019

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणेबाबत.

संदर्भ : १. मा.शिक्षणाधिकारी (प्रा.) यांचे पत्र जा.क्र./जिपअ/शि/शापोआ/२२०२/२०१९ दि.१८/०३/२०१९
      २. मा. शिक्षण संचालक (प्रा.)म.रा.पुणे यांचे पत्र क्र.शापोआ/दुष्काळ ता.नि./३०७/२०१८-१९/७०८/दि.१६/३/२०१९
       ३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.पसमो/शिक्षण/शापोआ/१७६३ दि.०४/०४/२०१९

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सूचित करण्यात येते की, संदर्भ क्र. १ नुसार दुष्काळग्रस्त/ टंचाई सदृश्य भागामधील शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाईल याबाबत दक्षता घेण्याचे मा. शिक्षण संचालक, पुणे यांचे निर्देश आहेत. याबाबत या कार्यालयाचे संदर्भ क्र. ३ या पत्रानुसार यापूर्वीच सर्व केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक यांना अवगत करण्यात आलेले आहे.
       तरिही, काही शाळा याबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने पुन:श्च खालील प्रमाणे स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत--
1)      संदर्भीय पत्रांमधील निर्देशानुसार दुष्काळग्रस्त/ टंचाई सदृश्य भागामधील शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाईल याबाबत दक्षता घ्यावी. यामध्ये मोर्शी तालुक्यातील सर्व शाळांचा समावेश आहे.

2)     विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शालेय पोषण आहार देणे शाळांना बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत असा निष्कर्ष काढून परस्पर ठराव घेण्यात येऊ नयेत.

3)      संपूर्ण तालुक्यामध्ये आहार शिजविण्याच्या वेळेमध्ये एकवाक्यता तसेच समन्वय रहावा याकरिता प्रत्येक कार्यदिनी सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेमध्ये आहार शिजविणे व वाटप हे कार्य करावे.

4)      वरील बाबी विचारात घेऊन तांदूळ व धान्यादि माल आवश्यक असल्यास २० दिवसांपूर्वीच या कार्यालयाकडे मागणी नोंदवावी.
                               
5)      लाभार्थी उपस्थिती संख्येनुसारच स्वयंपाकी - मदतनीस यांचे मानधन अदा केले जाईल याची नोंद घ्यावी.

6)      केंद्रप्रमुखांनी याबाबत शाळास्तरावरून उपरोक्त सर्व शासन निर्देशांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी. तसेच, दर आठवड्याच्या आढावा सभेत याबाबत अहवाल द्यावा व दिरंगाई करू नये.