संदर्भ : १. मा.शिक्षणाधिकारी (प्रा.) यांचे पत्र जा.क्र./जिपअ/शि/शापोआ/२२०२/२०१९ दि.१८/०३/२०१९
२. मा. शिक्षण संचालक (प्रा.)म.रा.पुणे यांचे पत्र क्र.शापोआ/दुष्काळ ता.नि./३०७/२०१८-१९/७०८/दि.१६/३/२०१९
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.पसमो/शिक्षण/शापोआ/१७६३ दि.०४/०४/२०१९
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सूचित करण्यात येते की, संदर्भ क्र. १ नुसार दुष्काळग्रस्त/ टंचाई सदृश्य भागामधील शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाईल याबाबत दक्षता घेण्याचे मा. शिक्षण संचालक, पुणे यांचे निर्देश आहेत. याबाबत या कार्यालयाचे संदर्भ क्र. ३ या पत्रानुसार यापूर्वीच सर्व केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक यांना अवगत करण्यात आलेले आहे.
तरिही, काही शाळा याबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने पुन:श्च खालील प्रमाणे स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत--
1) संदर्भीय पत्रांमधील निर्देशानुसार दुष्काळग्रस्त/ टंचाई सदृश्य भागामधील शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाईल याबाबत दक्षता घ्यावी. यामध्ये मोर्शी तालुक्यातील सर्व शाळांचा समावेश आहे.
2) विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शालेय पोषण आहार देणे शाळांना बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत असा निष्कर्ष काढून परस्पर ठराव घेण्यात येऊ नयेत.
3) संपूर्ण तालुक्यामध्ये आहार शिजविण्याच्या वेळेमध्ये एकवाक्यता तसेच समन्वय रहावा याकरिता प्रत्येक कार्यदिनी सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेमध्ये आहार शिजविणे व वाटप हे कार्य करावे.
4) वरील बाबी विचारात घेऊन तांदूळ व धान्यादि माल आवश्यक असल्यास २० दिवसांपूर्वीच या कार्यालयाकडे मागणी नोंदवावी.
5) लाभार्थी उपस्थिती संख्येनुसारच स्वयंपाकी - मदतनीस यांचे मानधन अदा केले जाईल याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment