"पंचायत समिती मोर्शीच्या शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाचे मा. शिक्षण सभापती जिल्हा परिषद, अमरावती यांचे शुभहस्ते उदघाटन"
जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पंचायत समिती मोर्शीच्या शिक्षण विभागाने नव्यानेच या विभागाचे स्वतंत्र असे www.educationmorshi.com
हे शैक्षणिक व प्रशासकीय संकेतस्थळ विकसित केले. मा. श्रीमती मनिषा खत्री, (मुख्य कार्यकारी अधिकारी) जिल्हा परिषद, अमरावती यांच्या प्रेरणेने विकसित केलेल्या या संकेतस्थळाचे औपचारिक उदघाटन आज दिनांक 09/07/2019 रोजी मा.श्री जयंतराव देशमुख (शिक्षण सभापती) जि. प. अमरावती यांच्या शुभहस्ते तसेच मा. श्री रामभाऊ तुरणकर (शिक्षणाधिकारी प्राथमिक) जि. प. अमरावती यांचे उपस्थितीत करण्यात आले.
सदर संकेतस्थळ श्रीमती अश्विनी पवार (गटशिक्षणाधिकारी) पंचायत समिती, मोर्शी यांच्या नेतृत्वाखाली मोर्शी पंचायत समिती मधील तंत्रस्नेही शिक्षक श्री. मो. मुजाहिद फराज, श्री. सुरज अंबाडकर, श्री. रिजवान सौदागर व श्री. निलेश इंगोले यांनी बाहेरील कोणत्याही तंत्रज्ञाची मदत न घेता तसेच कोणताही खर्च न करता विकसित केले. मोर्शीच्या या तंत्रस्नेही टीमने अत्यंत अभ्यासपूर्वक सर्वसमावेशक असे संकेतस्थळ तयार केल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उदघाटनपर कार्यक्रमात श्रीमती अश्विनी पवार यांनी सादरीकरण केले. मा. जयंतराव देशमुख यांनी या संकेतस्थळाचे मनापासून कौतुक केले. तसेच हा आपल्या जिल्ह्यातील अभिनव उपक्रम असून अमरावती जिल्हा परिषदेस ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संपूर्ण जिल्ह्यात उर्वरित पंचायत समितींनी मोर्शी तंत्रस्नेही टीमच्या सहकार्याने याच धर्तीवर संकेतस्थळ विकसित करावे असे निर्देशसुद्धा दिले.
या उद्घाटन तथा सत्कार सोहळ्यास शिक्षण समिती, जिल्हा परिषद अमरावती चे सन्माननीय सदस्य मा. श्री राजेंद्र पाटील, मा. श्री राजेंद्र बहुरूपी, मा.श्री शाम मसराम , मा.श्रीमती अलकाताई देशमुख, मा. श्रीमती पूजाताई येवले, मा. श्रीमती वैशालीताई बोरकर, मा. श्रीमती शिल्पाताई भलावी तसेच श्री अमोल इखे लेखाधिकारी व जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक श्री ज्ञानेश्वर घाटे, श्री जयेश वरखेडे व जि.प. IT cell चे श्री संजय राठी यांचे सहकार्य लाभले.


2 comments:
अभिनंदन टीम मोर्शी.!!
अतिशय अभिनव आणि उपयुक्त उपक्रम.
धन्यवाद.
........गोविंद देशमुख, पुणे.
THANK YOU VERY MUCH !!!
Post a Comment