Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

Monday, August 26, 2019

यशोगाथा लोकसहभागाची-----जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड

यशोगाथा लोकसहभागाची





जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड💐💐💐💐💐

आपल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा असाव्यात असं कुणाला वाटत नाही ? भौतिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना सोयी सुविधा तर मिळतातच पण, शाळेचं  बाहयरुप सुद्धा खुलून दिसतं. विद्यार्थी शिक्षक जिथे सहा- सात तास राहतात, तिथे त्यांना मनापासून आनंदानं राहावसं वाटतं.
शाळांमध्ये असावी अशी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे  हॅण्ड वॉश स्टेशन. कुणाला वाटत नाही  की,माझ्या शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन असावं? त्यातून विद्यार्थ्याला स्वच्छतेचे संस्कार आपसुकच मिळतात. RTEअंतर्गत शाळेच्या दहा निकषांमध्ये म्हणूनच हॅण्डवॉश  स्टेशन समाविष्ट केले गेले आहे. निरामय आरोग्याची सुरुवात स्वच्छ हातांपासून होते आणि अभ्यासातील प्रगती आणि आरोग्याचा सहसंबंध सर्वमान्य आहेच.

गाव करी ते राव न करी, या उक्तीप्रमाणे लोकसहभागाचे महत्त्व सर्वश्रुत आहेच. अशाच एका यशस्वी लोकसहभागाची कथा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, हिवरखेड येथे उभं राहिलेलं  हॅण्ड वॉश  स्टेशन. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये  hand wash station ची  संकल्पना सर्व संमत करण्यात आली. पण पैसा कसा उभारायचा? ही अडचण सर्वांसमक्ष उभी ठाकली. मग या  hand wash स्टेशनसाठी तर एक भन्नाट कल्पना सुचवण्यात आली. याकरीता शाळेतच मंदिरांप्रमाणे दानपेटीत ठेवण्यात आली. दरवर्षी दानपेटी जुलै महिन्यात फोडण्यात येत असे.पण त्यातूनही पुरेसा निधी उभा राहिला नाही. अशा वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गोपालभाऊ मडघे त्याचप्रमाणे गावातील काही शिक्षणप्रेमी मंडळी यांनी भरघोस दान देऊन जवळपास तीस हजार रुपये निधी जमा केला. चांगल्या कार्यास परमेश्वराचं सहाय्य असतं असं म्हणतात, त्याचप्रमाणे गावातील श्री. नंदकिशोर गांधी यांनी या हॅण्डवॉश स्टेशन ला टाईल्स दिल्या. आणि एखाद्या स्वप्नाप्रमाणे हे हँडवॉश स्टेशन उभे राहीले....
लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं .
आणि या पंधरा ऑगस्टला पंचायत समिती सदस्या मा.सौ मायाताई वानखडे, सरपंच श्री. विजयभाऊ पाचारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गोपालभाऊ मडके, गावकरी मंडळी पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॅण्ड वॉश स्टेशन चा उद्घाटनीय सोहळा पार  पडला. आता हे हॅण्ड वॉश  स्टेशन विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू झालेले आहे.

ऋणनिर्देश🙏🙏

या विद्यार्थी उपयोगी hand wash station करिता समाजातील ज्या सर्व दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले,त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन  💐💐


No comments: