गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आधार - प्रत्यक्ष अनुभवातून करूया साकार

या कार्यक्रमाला
मा.श्री.सारंगभाऊ खोडस्कर (सदस्य,जि.प.अमरावती),
मा.श्री.रमेशभाऊ खातदेव (उपसभापती,पं.स मोर्शी),
मा.श्रीमती अश्विनीताई पवार (गटशिक्षणाधिकारी पं. स. मोर्शी),
मा.श्री सुनीलभाऊ कडू (सदस्य,पं. स.मोर्शी) त्याचप्रमाणे सन्मानीय शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी,पालक वर्ग आदी मान्यवर मंडळी हजर होती.


त्याचप्रमाणे जि.प.उच्च प्रा. शाळा दापोरी येथेसुद्धा अशाच नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रमांची सुरवात करण्यात आलेली आहे. शिक्षणशास्त्रात म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अध्ययन-अनुभव जेवढी अस्सल असतील तेवढी ती दर्जेदार आणि परिणामकारक ठरतात. मुलं या उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग घेऊन स्वतःच स्वतः शिकतो.
या उपक्रमाची उद्दीष्टे
1)-विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा संबंध दैनंदिन जीवनाशी जोडता येणे.
2)-बचतीची सवय लागणे,पैशाचा विनिमय करता येणे.
3)-बँकेच्या व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव येणे.
4)-बँक व्यवहाराशी संबंधित पारिभाषिक शब्दांचा( उदा.डेबिट-क्रेडिट)परिचय होणे.
5)-गणितीय क्रियांची समज येते.शाब्दिक उदाहरणातील क्रिया कळण्यास मदत होते.
6)-शालेय साहित्य भांडारद्वारे ग्रामीण भागातील मुलांना वेळेवर लेखन साहित्य उपलब्ध होते.सहभागी विद्यार्थ्याला नफा-तोटा हा संबोध प्रत्यक्ष कळतो.
फलश्रुती
1)-विद्यार्थी स्वतः कृतीयुक्त सहभाग घेतो त्यामुळे त्याला आंनद मिळतो.
2)-विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया घडून येते,त्यांच्यामधील समन्वय वाढीस लागतो.
3)- अशा उपक्रमामुळे शाळा-विद्यार्थी नाते दृढ होण्यास मदत होते.
शाळेतील सर्व विद्यार्थी मनापासून आणि आनंदाने अश्या उपक्रमात सहभागी होतात हे वेगळे सांगावयास नको.
असे अभिनव उपक्रम राबविणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक कार्यास अनंत शुभेच्छा....💐💐💐
2 comments:
Excellent👍😆👍👏
कौतुकास्पद
Post a Comment